Jivan Sanjivani Enterprises (Proprietor: Yash Rajesh Chavan)
अटी व शर्ती
परिचय
ही वेबसाइट व तिच्यावरील ऑनलाइन कार्यशाळा/कोर्स Jivan Sanjivani Enterprises (Proprietor: Yash Rajesh Chavan) तर्फे चालवले जातात. पेमेंट करून किंवा सेवा वापरून तुम्ही या अटी मान्य करता.
सेवा
आम्ही नाडी परीक्षण व संबंधित विषयांवरील ऑनलाइन (Zoom वर live) कार्यशाळा व कोर्स देतो. वेळापत्रक व तपशील प्रत्येक पेमेंट पानावर दिलेले असतात.
पेमेंट
सर्व पेमेंट भारतीय रुपयांमध्ये Razorpay या सुरक्षित पेमेंट गेटवेमार्फत घेतले जातात. ₹1,000 ची booking रक्कम फक्त जागा राखून ठेवण्यासाठी आहे — ती प्रवेश (admission) नाही. पूर्ण फी भरल्यानंतरच प्रवेश निश्चित होतो.
वापराचे नियम
कोर्सचे recording, नोट्स व साहित्य फक्त तुमच्या वैयक्तिक वापरासाठी आहे. ते शेअर करणे, विकणे किंवा पुन्हा प्रकाशित करणे मनाई आहे. नियमभंग झाल्यास प्रवेश रद्द केला जाऊ शकतो.
जबाबदारी
कोर्समधील माहिती शैक्षणिक हेतूसाठी आहे; ती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही.
कायदा
या अटींवर भारतीय कायदे लागू होतात; वाद असल्यास सांगली (महाराष्ट्र) येथील न्यायालयांना अधिकार क्षेत्र राहील.